Gotha bandhkam anudan 2024 : गाय गोठा बांधकाम करण्यासाठी 77,188 इतके अनुदान, लगेच अर्ज करा

आता शेतकरयांना जनावरांसाठी गोठा बांधकामासाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे. ज्या शेतकरयांना जनावरे बांधण्यासाठी गोठा नाही किंवा मोडकळीस आलेला अश्या परिस्थितीत असलेल्या शेतकरयांना गोठा मिळणार आहे. Gotha bandhkam anudan 2024

Gotha bandhkam anudan 2024, गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे

ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या गोठ्याची जागा ही सर्वसाधारणपणे ओबडधोबड व खाचखळग्यानी भरलेली असते, सदरचे गोठे हे क्वचितच व्यवस्थितरित्या बांधले जातात. गोठयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचे शेण व मूत्र पडलेले असते तसेच पावसाळयाच्या दिवसांत गोठयातील जमिनीस दलदलीचे स्वरुप प्राप्त होते व सदर जागेतच जनावरे बसत असल्यामुळे ते विवीध प्रकारच्या आजारांना बळी पडतात.

तसेच काही जनावरांना स्तनदाह होऊन उपचारांसाठी हजारो रुपये खर्च होतात. तर काही वेळेस गाई/म्हशींची कास निकामी होते, त्यांच्या शरीराच्या खालील बाजूस जखमा होतात. बऱ्याच ठिकाणी जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी बांधलेल्या नसतात. त्यांच्यापुढील मोकळया जागेवरच चारा टाकला जातो. या चाऱ्यावर बऱ्याच वेळा शेण व मूत्र पडल्याने जनावरे चारा खात नाही आणि चारा वाया जातो, ही परिस्थिती टाळण्यासाठी गव्हाणे तसेच पक्का गोठा असणे आवश्यक आहे.

Gotha bandhkam anudan 2024, गोठा प्रस्ताव pdf आणि शासन निर्णय 

महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत Gotha bandhkam anudan हि योजना राबविली जात आहे. या संदर्भात 3 फेब्रुवारी 2021 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यासंबंधीचा गोठा प्रस्ताव pdf आणि संबंधित शासन निर्णय पुढे दिला आहे.

गोठा प्रस्ताव pdf download करा 

शासन निर्णय येथे पहा 

शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना मधून गाय व म्हशी, कुक्कुटपालन शेड, शेळी पालन योजना इ. साठी अनुदान मिळते.

Gotha bandhkam anudan 2024, करिता किती अनुदान मिळते?

  • गाई म्हैस गोठा बांधकाम करण्यासाठी 77,188/- रुपये अनुदान दिले जाते.
  • कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी 49,760/- रुपये अनुदान दिले जात आहे.
  • शेळीपालन शेड बांधण्यासाठी 49,284/- रुपये इतके अनुदान दिले जाते.
  • नाडेप कंपोस्टिंग करिता 10,537/- रुपये अनुदान शेतकऱ्यांना शासनाकडून उपलब्ध करून दिले जात आहे.

गोठा प्रस्ताव pdf वरील ठिकाणी दिली आहे. ती pdf download करा आणि त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरा, तसेच आवश्यक कागदपत्रे जोडा आणि हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायत मध्ये पुढील कार्यवाहीसाठी दाखल करा.

सविस्तर माहिती साठी वरील ठिकाणी दिलेला शासन निर्णय वाचा.

Leave a Comment

Close Visit agrinews