7th pay commission : 31 जानेवारी नंतर कर्मचार्‍यांच्या या भत्त्यात होणार वाढ..

7th pay commission : 31 जानेवारीनंतर महागाई भत्त्यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणखी एक भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार आहे. कर्मचारी या दिवसाची वाट पाहत आहेत. या दिवशी कर्मचाऱ्यांना दोन भेटवस्तू मिळतील. सरकारने या संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

जुलै 2023 ते डिसेंबर 2023 या सहामाहीच्या आधारावर जानेवारी 2024 पासून नवीन आणि वाढीव महागाई भत्ता केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. केंद्रीय कर्मचारी 31 जानेवारी 2024 ची वाट पाहत आहेत. या दिवशी त्यांना दोन भेटवस्तू मिळणार आहेत. पहिली भेट महागाई भत्त्याच्या (DA Hike) स्वरूपात असेल. तथापि, मार्च 2024 मध्ये त्याची घोषणा केली जाईल.

त्याचवेळी आणखी एक मोठी खूशखबर आहे त्याची पण सरकारी कर्मचारी वाट पाहत आहेत. 31 जानेवारीनंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात आणखी ३ टक्के वाढ होणार आहे. 2021 नंतरची ही सर्वात फायदेशीर भेट केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

3 टक्क्यांनी वाढेल हा भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) लवकरच ५० टक्क्यांच्या पुढे जाईल. सध्या 46% दराने महागाई भत्ता दिला जात आहे.

महागाई भत्त्यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणखी एका भत्त्यातही वाढ होणार आहे. घरभाडे भत्ता (HRA Allowance) देखील वाढणे निश्चित आहे. या वाढीबाबत केंद्र सरकारने नियम स्पष्ट केले आहेत.

हा नियम केवळ महागाई भत्त्याशी संबंधित आहे. 2021 मध्ये, HRA मध्ये सुधारणा झाली जेव्हा महागाई भत्त्यात 25% च्या वर वाढ झाली, त्यावेळेस जुलै 2021 मध्ये DA 25% ओलांडताच, HRA मध्ये 3% ची वाढ झाली.

HRA चे सध्याचे दर 27%, 18% आणि 9% आहेत. महागाई भत्ता लवकरच 50 टक्क्यांवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास, HRA मध्ये पुन्हा एकदा 3 टक्के सुधारणा केली जाईल.

शहरांनुसार HRA मध्ये वाढ

DoPT च्या मते, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता (HRA) मध्ये सुधारणा महागाई भत्त्याच्या आधारावर केली जाते. वाढीव HRA चा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शहराच्या श्रेणीनुसार, HRA 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के दराने उपलब्ध आहे. यासाठी सरकारने 2015 साली निवेदन दिले होते. यामध्ये HRA ला DA शी जोडण्यात आले होते. त्याचे तीन दर   0, 25, 50 टक्के असे ठरलेले आहेत.

HRA X,Y आणि Z श्रेणींमध्ये उपलब्ध

50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे X श्रेणीत येतात. या शहरांमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना २७ टक्के HRA मिळेल. तर Y श्रेणीतील शहरांमध्ये हे प्रमाण 18 टक्के आणि Z श्रेणीत 9 टक्के असेल.

घरभाडे भत्ता ची गणना

7व्या वेतन आयोग नुसार, लेव्हल-1 वर ग्रेड पे वरील केंद्रीय कर्मचार्‍यांचे कमाल मूळ वेतन 56,900 रुपये प्रति महिना आहे, त्यानंतर त्यांचा HRA 27 टक्के दराने मोजला जातो. साध्या हिशोबात समजले तर…

HRA = रु 56,900 x 27/100 = रु. 15,363 प्रति महिना

30% HRA सह = रु 56,900 x 30/100 = रु. 17,070 प्रति महिना

HRA मध्ये एकूण फरक: रु 1,707 प्रति महिना

वार्षिक HRA मध्ये वाढ – रु 20,484

अश्या प्रकारे महागाई भत्ता 50 टक्के च्या वर पोहचल्यावर तुमच्या घरभाडे भत्त्यात 3 टक्के वाढ होणार आहे, म्हणजेच वरील गणना नुसार वार्षिक घरभाडे भत्त्यात 20 हजार हून अधिक रुपयांची भेट केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Visit agrinews