मतदार यादी 2024 : तुमचे नाव आहे का? घरबसल्या झटपट तपासा!

sarkari mitra
2 Min Read

मतदार यादी 2024: तुमचे नाव आहे का? घरबसल्या झटपट तपासा!

मतदार यादीत नाव तपासण्याचे महत्त्व

महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानासाठी जाण्यापूर्वी तुमचे नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करून घ्या. अनेकदा मतदान ओळखपत्र असूनही मतदार केंद्रावर पोहोचल्यावर मतदार यादीत नाव नसल्याचे दिसते. या समस्येपासून वाचण्यासाठी आधीच तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही ते तपासणे गरजेचे आहे.

टप्पा 2: निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नाव तपासण्याची प्रक्रिया

  1. सर्वप्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर (https://www.eci.gov.in) लॉग इन करावे लागेल.

तुमचे नाव येथे तपासा

  1. वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यावर, डाव्या बाजूला “Search Your Name in Voter List” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  2. एक नवीन पेज उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.
  3. राज्य निवडल्यावर आणखी एक पेज ओपन होईल. येथे तुमचा EPIC (Electors Photo Identity Card) नंबर टाकावा.
  4. कॅप्चा कोड भरा आणि सर्च करा. जर तुमचे नाव मतदार यादीत असेल, तर संपूर्ण माहिती दिसेल. तुम्ही या पेजचे प्रिंटआउट काढू शकता, ज्यामध्ये तुमच्या मतदान केंद्राची माहिती असते.

यादीत नाव कसे पाहायचे त्या करिता सविस्तर व्हिडिओ पहा

टप्पा 3: मोबाईल क्रमांकाचा वापर करून नाव तपासणे

तुमचा मोबाईल क्रमांक मतदार यादीत नोंदवला असेल, तर त्या क्रमांकाद्वारे देखील नाव तपासता येते. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि सर्च पर्यायावर क्लिक करा.

टप्पा 4: SMS आणि टोल-फ्री नंबरद्वारे पडताळणी

तुम्ही SMS द्वारे देखील तुमचे नाव मतदार यादीत तपासू शकता. यासाठी खालील प्रक्रिया करा:

  • तुमच्या मोबाईलवर ‘ECI Voter ID’ असा मेसेज टाईप करा आणि त्यात तुमचा EPIC नंबर घाला.
  • हा मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मतदार यादीतील नावाची स्थिती कळेल. ही सेवा मोफत आहे.
  • 1950 या टोल-फ्री नंबरवर कॉल करून देखील ही माहिती मिळवू शकता. हा नंबर मोफत आहे आणि यावरून मतदार यादीतील तुमचे नाव आहे की नाही ते तपासू शकता.
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *