या विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 6000 रू. शासन निर्णय निर्गमित

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत दिनांक 23/01/2024 रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

दि.02/03/2023 च्या शासन निर्णयान्वये पीएम श्री शाळा या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पीएम श्री शाळा योजनेंतर्गत एकूण 5651 विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता देणेबाबत हा शासन निर्णय राज्य शासनाकडून जारी करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पीएम श्री शाळा योजने संदर्भात प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक पुस्तिका-भाग २- Implementation and Programmatic Guidelines अन्वये पीएम श्री शाळेत शिकणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांना वाहतूक / मदतनीस सुविधा अनुज्ञेय करण्यात आली आहे. सद्यस्थितीत राज्यात या योजनेचा पहिला टप्पा राबविण्यात येत असून त्यात एकूण 516 शाळांचा समावेश आहे.

पीएम श्री शाळा योजनेंतर्गत वाहतूक मदतनीस सुविधेचा लाभ घेणाऱ्या इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यास प्रती विद्यार्थी प्रती वर्ष 6000/- रू. इतकी रक्कम अदा करण्या संदर्भात सदरील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सन 2024-25 करीता 1 कि.मी., 3 कि.मी., 5 कि.मी. अंतरावरून येणाऱ्या 5651 विद्यार्थ्याना या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे, त्यासंदर्भात शासन निर्णय आणि लाभार्थी यादी तुम्ही पुढे पाहू शकता.

शासन निर्णय आणि लाभार्थी यादी येथे पहा 

Leave a Comment

Close Visit agrinews