मोठी बातमी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा,निकालाच्या तारखा जाहीर, या तारखेला लागणार निकाल | HSC SSC Exam Result

HSC SSC Exam Result:दहावी व बारावीची परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहेत.

निकाल वेळेत लावण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे.

दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानुसार २५ मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल ६ जूनपूर्वी जाहीर होईल.

परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होईल, असेही त्यांनी सांगितले

यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला १७ लाख तर इयत्ता बारावीसाठी १२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

आता इयत्ता बारावीच्या ९९ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत.

तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ८५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत.

बोर्डाकडून दररोज उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला जात आहे.

दहावी बारावी निकालासंबंधी अधिक माहिती येथे क्लिक करून पहा

प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यापूर्वीच नोंदवून ठेवले असून आता उत्तरपत्रिका तपासून जशा जशा पूर्ण होतील तसे गुणपत्रिका तयार होत आहेत.

आता एका महिन्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होईल.

त्यानंतर इयत्ता दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे.

गतवर्षी बारावीचा निकाल २५ मे रोजी लागला होता.

यंदाही त्याचवेळी किंवा त्यापूर्वी निकाल जाहीर होईल, असेही बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

इतर बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Close Visit agrinews