Anandacha shidha: रेशन कार्ड धारकांना खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारीपासून पात्र शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे. हा राज्य सरकारचा मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 या दिवशी घेण्यात आला आहे.
आनंदाच्या शिध्यात कोणत्या वस्तू मिळणार ? Anadacha shidha
- साखर
- खाद्यतेल
- चनाडाळ
- रवा
- मैदा
- पोहे
या ६ वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना 22 जानेवारीपासून मिळणार आहे.
आनंदाचा शिधा कोणाला मिळणार ? Who will get anadacha shidha
राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्रय रेषेवरील (APL) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येणार असून सुमारे १.६८ कोटी शिधापत्रिका धारकांना लाभ मिळणार आहे.
इतक्या रुपयात मिळणार आनंदाचा शिधा, Anandacha shidha price
या आनंदाचा शिधा वितरणाकरीता येणाऱ्या ५४९.८६ कोटी रुपये अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. आनंदाचा शिधा प्रति संच १०० रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे.