विहिरी साठी 4 लाखाचे अनुदान, येथे पहा अटी आणि शर्ती
आता शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी 4 लाखाचे अनुदान महाराष्ट्र शासना कडून मिळणार आहे, त्या संबंधी शासन निर्णय आणि अर्जाचा नमूना फॉर्म पुढे दिला आहे. पात्रता आणि अटी तसेच अर्ज कोठे करावा अशी माहिती पुढे देण्यात आली आहे.
कोणाला मिळणार लाभ
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
- शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजने खालील लाभार्थी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी
- सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)
- अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)
विहीर करिता 4 लाख अनुदान लाभासाठी पात्रता
लाभधारकाच्या 7/12 वर याआधीच विहीरीची नोंद असू नये. लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे. दोन सिंचन विहिरींमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही. ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे. लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
विहिरी साठी 4 लाखाचे अनुदान मिळवण्याकरिता लाभार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमा करावा.