पीएम किसान योजनेत नवीन नियम लागू, फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार 2000/- रुपये

पीएम किसान योजना: नवीन नियमावलीतील बदल सविस्तर

पीएम किसान योजनेसाठी नवीन नियम लागू

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी “पीएम किसान सन्मान निधी योजना” सुरू केली होती. या योजनेत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात. आता या योजनेत काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, ज्यांची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

पी एम किसान योजना अधिकृत वेबसाईट वर पहा सविस्तर माहिती

1. जमीन खरेदीसाठी नवीन अट

  • जर शेतकऱ्याने जमीन २०१९ पूर्वी खरेदी केली असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
  • वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या बाबतीतही या योजनेचा लाभ घेता येईल.

2. आधार कार्ड संलग्न करणे आवश्यक

  • योजनेत नाव नोंदवताना शेतकऱ्याला पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

3. पती-पत्नी किंवा मुलांना योजनेचा लाभ

  • योजनेचा लाभ फक्त कुटुंबातील एका सदस्याला दिला जाईल.
  • जर पती-पत्नी किंवा अठरा वर्षांवरील मुलांचा समावेश असेल, तर त्या कुटुंबातील एकालाच या योजनेचा लाभ मिळेल.

4. उताऱ्यावरील नोंदींची तपासणी

  • जर शेतकऱ्याच्या नावावर २०१९ पूर्वी जमीन नोंद असेल किंवा वारसा हक्काने नोंद झाली असेल, तरच ते पात्र ठरतील.
  • २०१९ नंतर जमीन नावावर घेणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही, जर त्या जमिनीची नोंद माहेरवाशिणीकडून घेतली असेल तर दोन्हीकडून लाभ घेता येणार नाही.

5. निधनानंतर योजनेचा लाभ

  • पात्र शेतकऱ्याचे निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला योजनेचा लाभ दिला जाईल.

आवश्यक कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:

  1. नवीन सातबारा उतारा (७/१२ उतारा).
  2. आठ अ उतारा (शेतजमिनीची नोंद).
  3. लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती-पत्नीचे आधार कार्ड.
  4. फेरफार (नोंदबदल) दस्त.
  5. विहित नमुना अर्ज.
  6. शिधापत्रिका (राशन कार्ड).

पीएम किसान योजना: संक्षिप्त माहिती

  • शासनाची सुरुवात: २०१९ मध्ये.
  • लाभ: वर्षाला सहा हजार रुपये, तीन हप्त्यात.
  • लाभार्थी: शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील एकच व्यक्ती.

या नियमांमुळे पात्र शेतकऱ्यांची संख्या निश्चितच कमी होईल, परंतु योजनेच्या शुद्धीकरणासाठी हे बदल गरजेचे आहेत. शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रांसह वेळेवर अर्ज करणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Close Visit agrinews