घर बांधण्यासाठी जागा खरेदीकरिता 1 लाख रुपये अनुदान, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

सन २०२४ पर्यंत, केंद्र आणि राज्य शासनाने सर्व बेघर कुटुंबांसाठी घरे उपलब्ध करण्याची मोहीम आणि योजना सुरू केली आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना अशी केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांतर्गत बेघर लोकांसाठी घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध केले जाते.

शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ बरेच लाभार्थी घेतात, परंतु ज्यांना घर बांधण्यासाठी स्वतःची जागा नाही ते नागरिक घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे; परंतु आता अनुदानात वाढ करून 50 हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

म्हणून आता घरकुल बांधकामासाठी जागा खरेदी करण्याकरिता भूमिहीन नागरिकांना 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. Pandit din Dayal Upadhyaya gharkul land parchase scheme

लवकरच शासन निर्णय उपलब्ध होईल

सध्या, राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे जागांच्या किंमतीत उच्च वाढ झाल्याने, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हे योजनेचे अंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना एक लाख रुपये करून जागा खरेदीसाठी सुविधा देण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews