तुमच्या खात्यावर 300/- रू. LPG गॅस सबसिडी जमा झाली किंवा नाही असे चेक करा

LPG Gas Subsidy Check Status : साधारणतः आता सर्वजण एलपीजी गॅस चा उपयोग घरगुती वापरासाठी करत आहे. परंतु तुम्ही विकत घेत असलेला एलपीजी गॅस वर (प्रधानमंत्री उज्वला योजना) अंतर्गत तुम्हाला 300/- रुपये सबसिडी मिळते.

परंतु काही लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी पडली किंवा नाही हे समजत नाही या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला मिळत असलेली सबसिडी कशी चेक करायची ते पुढे सांगणार आहोत.

आज प्रत्येक लाभार्थी जो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत येतो, त्यांना सरकारकडून 200 रू.ते 300 रुपयापर्यंतचे अनुदान दिले जाते. ते अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. ही सबसिडी तुम्ही घरबसल्या ही तपासू शकता. यासाठी काही स्टेप आहेत ज्याद्वारे तुम्ही एलपीजी गॅस सबसिडी सहज तपासू शकता.

  • सर्व प्रथम आपण My LPG असे टाइप करा आणि शोधा.
  • आता पुढे अधिकृत वेबसाइट उघडेल त्या वेबसाईट मध्ये प्रवेश करा.
  • तुम्हाला सर्वात वर गॅस सिलेंडर कंपनीचा फोटो दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • जर तुम्ही या वेबसाइटला पहिल्यांदा भेट दिली असेल तर New User या पर्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला Registration करावे लागेल.
  • हे सर्व केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर User ID आणि Password मिळेल.
  • या User ID आणि Password च्या मदतीने तुम्ही तुमचा आयडी उघडू शकाल. ज्यासाठी तुम्हाला या आयडीने Login करावे लागेल.
  • आयडी Login केल्यानंतर, तुम्हाला बाजूला सिलेंडर इतिहास पहा View cylinder history असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • तुम्ही क्लिक करताच, काही वेळानंतर सबसिडीचा संपूर्ण इतिहास उघडेल आणि तुम्हाला माहिती मिळू शकेल.
  • सबसिडीच्या इतिहासात, तुम्ही सध्याची स्थिती तपासू शकता आणि सबसिडीची रक्कम मिळाली आहे की नाही हे देखील तुम्ही तपासू शकता. अशाप्रकारे तुम्हाला सबसिडी मिळाले किंवा नाही तसेच मागील बाकी कधी मिळाली ते समजू शकेल.

Leave a Comment

Close Visit agrinews