Ladki Bahin Yojana Installment : राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात 1500 हजार रुपये जमा करण्यात येत आहे; परंतु जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे 4500 रुपये कधी पडणार असे पात्र महिलांना सतत प्रश्न पडत होता पण याबाबत आता तारीख ठरली आहे.
लाडकी बहीण योजनेची पात्र महिलांची यादी पहा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण:
- तारीख: 29 सप्टेंबर 2024
- ठिकाण: रायगड
कार्यक्रमाचे उद्दिष्ट:
- सप्टेंबर महिन्यापर्यंत योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ वितरीत केला जाणार आहे.
- जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या पण त्रुटी किंवा तांत्रिक कारणांमुळे लाभ मिळालेल्या महिलांना देखील या टप्प्यात लाभ दिला जाणार आहे.
लाभाचे वितरण:
- योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
- जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरलेल्या पण बँक खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांच्या खात्यात: 4500 रुपये जमा केले जातील.
- इतर सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात: 1500 रुपये जमा केले जाणार आहेत.
कार्यक्रमाचे महत्व:
- पुणे आणि नागपूर येथे आधी दोन टप्प्यांचे आयोजन झाल्यानंतर रायगड येथे हा तिसरा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रमातून पात्र महिलांना आवश्यक त्या लाभांचा प्रत्यक्ष लाभ मिळेल, आणि त्यांच्या खात्यांमध्ये निधी जमा केला जाईल.