लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचा अपडेट : लाखो महिलांना अपात्र ठरविण्यात आले, जाणून घ्या तुमचे नाव आहे का?
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेतून आतापर्यंत पाच हप्ते मिळून एकूण 7500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सध्या या योजनेचा सहावा हप्ता कधी मिळेल, याची महिलांना उत्सुकता आहे.
परंतु काही महिलांना योजनेच्या पात्रतेच्या अटींच्या उल्लंघनामुळे अपात्र ठरवण्यात आले आहे, त्यामुळे त्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. यामुळे महिलांनी त्यांचे नाव अपात्र यादीत आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होईल. ज्यांनी योजनेच्या अटी आणि शर्ती पाळल्या आहेत, त्यांना योजनेचा संपूर्ण लाभ मिळेल.
सरकारने अर्जदारांच्या पात्रतेची पुन्हा तपासणी केली असून, संजय गांधी निराधार योजना आणि इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांपैकी काहींना अपात्र ठरवले आहे. या महिलांना योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही.
अपात्र महिलांची यादी महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे. महिलांनी खालील पद्धतीने आपले नाव तपासावे.
- लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करा.
- तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका.
- ‘अपात्र अर्ज’ विभागावर क्लिक करून तुमचे नाव आहे का, हे तपासा.
ज्यांनी पात्रतेचे सर्व निकष पूर्ण केले असूनही पैसे मिळाले नाहीत, अशा महिलांच्या खात्यातही 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सर्व हप्त्याचे पैसे जमा होतील. परंतु, अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
काही अर्जदारांनी अर्ज करताना चुकीची माहिती सादर केली होती किंवा पात्रतेच्या निकषांचे पालन केले नव्हते. त्यामुळे अशा अर्जांची सरकारने पुन्हा तपासणी केली. विशेषतः, संजय गांधी निराधार योजना किंवा इतर शासकीय योजना लाभार्थींना या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे.
महिला लाभार्थींनी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली पात्रता तपासावी. जर तुम्ही पात्र असाल, तर सहाव्या हप्त्याचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील.