आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप संदर्भात 23/01/2024 चा शासन निर्णय (GR)

Crop Damage Compensation GR : राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. नुकसान भरपाई वाटप संदर्भात दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग अंतर्गत अत्यंत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

मार्च ते ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमीन मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.२७५.३० लक्ष (अक्षरी रुपये दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष तीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जून ते ऑक्टोबर, २०२3 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके / शेत जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत (पावसाळी हंगाम 2023 आदेश क्र.6)

Leave a Comment

Close Visit agrinews