मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात थेट जमा केले जातात.
डिसेंबर महिन्याचा हप्ता
डिसेंबर २०२४ महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 67 लाख महिलांच्या खात्यावर डिसेंबर चा हप्ता 24 डिसेंबर रोजी जमा करण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत शिल्लक महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे १,५०० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
२,१०० रुपयांचा हप्ता:
महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वचन दिले होते की, त्यांच्या सरकारच्या स्थापनेनंतर पात्र महिलांना २,१०० रुपयांचा हप्ता दिला जाईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पात विचार केला जाईल असे म्हटले आहे. म्हणजेच, एप्रिल २०२५ पासून पात्र महिलांना २,१०० रुपयांचा लाभ दिला जाऊ शकतो.
बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का, हे कसे तपासावे
- बँक खाते तपासा: आपल्या बँक खात्याचा ताज्या व्यवहारांचा तपशील बघा.
- SMS सूचना: अनेक बँका खात्यातील व्यवहारांची माहिती SMS द्वारे पाठवतात. आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेले संदेश तपासा.
- बँकेच्या मोबाइल अॅपद्वारे: आपल्या बँकेच्या अधिकृत मोबाइल अॅपमध्ये लॉगिन करून खाते शिल्लक आणि व्यवहार तपासा.
- बँकेच्या शाखेत भेट द्या: आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन खाते तपशील विचारू शकता.
महत्त्वाची सूचना
जर आपल्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल, तर आपल्या स्थानिक अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा. तसेच, आपल्या अर्जाची स्थिती आणि आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, हे तपासावे.
लाडकी बहीण योजनेबाबत अधिक माहितीसाठी, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
या योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी, खालील व्हिडिओ पाहू शकता.
लाडकी बहीण योजना 6वा हप्ता 1500₹ 67 लाख महिलांना जमा