DCCB Bank Recruitment 2025 : जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदिया येथे शिपाई, लिपिक आणि इतर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 77 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. भरतीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
Contents
भरती विभाग | जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदिया (DCCB) |
---|---|
पदांचे नाव | शिपाई, लिपिक, कनिष्ठ व्यवस्थापन अधिकारी |
एकूण पदे | 77 पदे |
अर्जाची प्रक्रिया | ऑनलाईन |
वयोमर्यादा | 21 ते 38 वर्षे |
शेवटची तारीख | 31 जानेवारी 2025 |
भरती कालावधी | कायमस्वरूपी (Permanent) |
अर्ज शुल्क | ₹885 |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
पदांची माहिती व पात्रता
- शिपाई (Peon):
- किमान 10वी परीक्षा उत्तीर्ण.
- इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक.
- लिपीक (Junior Clerk):
- कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यताप्राप्त विद्यापीठातून).
- एम.एस.सी.आय.टी. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
- वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.
- इंग्रजी व मराठी टंकलेखन व लघुलेखन कौशल्य असल्यास प्राधान्य.
- वर्ग II अधिकारी (कनिष्ठ व्यवस्थापन):
- कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवीधर.
- किमान 3 वर्षांचा बँकिंग अनुभव.
- प्राधान्यकृत पात्रता: MBA/JAIIB/CAIIB/GDC आणि संगणक ज्ञान.
निवड प्रक्रिया
- ऑनलाईन परीक्षा.
- कागदपत्र पडताळणी.
- मुलाखत.
- अंतिम निवड यादी.
- परिविक्षाधीन कालावधी (प्रोवेशन).
अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
महत्त्वाचे मुद्दे
- अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- निवड झालेल्या उमेदवारांना चांगले मासिक वेतन दिले जाईल.
- नोकरी ठिकाण: जिल्हा मध्यवर्ती बँक, गोंदिया.
नोट: जाहिरातीतील सविस्तर माहिती व अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक तपासा.