लाडकी बहिण योजनेचा 6वा हप्ता आजपासून 2100/- रू. जमा होण्यास सुरुवात, असे चेक करा तुमचे नाव December 24, 2024 by sarkari mitra लाडकी बहीण योजना: महिलांना आर्थिक मदतीचा डिसेंबर महिन्याचा हप्ता सुरू महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. 👉👉 लाडकी बहिण योजना नवीन अपडेट येथे पहा महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून राज्यातील ३५ लाख महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्याच्या अखेरीस देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, आणि आता या रकमांचे वितरण सुरू झाले आहे. महिला व बालविकास खातेमहिला व बालविकास खात्याचा कार्यभार आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आला आहे. खातेवाटप झाल्यानंतर लगेचच महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २१०० रुपये कधी मिळणार?महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील रक्कम वाढवण्याची घोषणा केली असून, लवकरच या योजनेअंतर्गत महिलांना २१०० रुपये दिले जातील. याबाबत अद्याप अचूक तारीख जाहीर झालेली नसली, तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजेच मार्च २०२४ नंतर ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होईल, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळत असून, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होत आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांपैकी एक महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे.