कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी: अतिरिक्त वेतनवाढीसंदर्भात महत्वाचे परिपत्रक निर्गमित
- पदोन्नतीनंतर वेतनवाढ:
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना “पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक” अथवा “केंद्रप्रमुख” या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, त्यांच्या वेतन निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये एक वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात दिनांक 20 मार्च 2024 व 14 मे 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या स्मरणपत्रांचा संदर्भ देण्यात आला आहे. - आर्थिक भार:
पदोन्नतीनंतर होणाऱ्या वेतनवाढीमुळे शासनावर येणाऱ्या आर्थिक भाराची माहिती संबंधित कार्यालयांकडून विहीत प्रपत्रांद्वारे मागविण्यात आली आहे. परंतु, ही माहिती अद्याप अप्राप्त असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. - उच्च न्यायालयीन प्रकरण:
पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीच्या तारखेपासून वेतनवाढ देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात शासनाने आर्थिक भाराची माहिती सादर करण्यासाठी संबंधितांना अनेक वेळा स्मरणपत्रे पाठविली आहेत.