सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी इतर लाभासह पगारात होणार मोठी वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2024 या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढ तसेच नवीन वेतन आयोग घोषणा होण्याची शक्यता आहे. एकूणच जानेवारी 2024 मध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू होणार आहे.

घरभाडे भत्ता वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांना 4 टक्के DA वाढीचा लाभ मिळाला असून सध्या 46 टक्के महागाई भत्ता लागू आहे, 2024 या वर्षी महागाई भत्त्यात 4% टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे एकूण महागाई भत्ता 51 टक्के होईल, म्हणजे महागाई भत्ता हा 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढेल, महागाई भत्ता मध्ये 50 टक्के पेक्षा जास्त वाढ झाल्यास सातव्या वेतन आयोगानुसार घरभाडे भत्त्यामध्ये वाढ होणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा जास्त होईल त्या वेळी घरभाडे भत्ता मध्ये पुढीलप्रमाणे वाढ होईल.

राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय करण्यात आलेला महागाई भत्ता हा 25 टक्क्यांची मर्यादा ओलांडेल त्यावेळी X , Y , Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के इतक्या दराने घरभाडे लागू होईल. तर ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारा महागाई भत्त्याचे दर हे 50 टक्क्यांपेक्षा अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्त्याचे दर हे X, Y, Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता दर (HRA) चे दर अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के, आणि 10 टक्के अशा वाढीव दराने मंजुर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

महागाई भत्ता वाढ 2024

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे नेहमी प्रमाणे महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार आहे. ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या (AICPI) आधारे, जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यामध्ये 5 टक्क्यांची वाढ होणार आहे.

नवीन वेतन आयोगाची अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

सरकारी कर्मचाऱ्यांना 8 व्या वेतन आयोगाचा लाभ लवकरच मिळणार आहे, कारण आठव्या वेतन आयोगाबाबत 1 फेब्रुवारी 2024 रोजी मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे असे विविध वृत्त माध्यमांचे म्हणणे आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews