अन्यथा… दहावी- बारावीची परिक्षा होणार नाही, काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रसारक मंडळाची दहावीची परीक्षा ही मार्च 2024 मध्ये तर बारावीच्या परीक्षा ह्या फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आणि त्याबाबतची बोर्डाची लेखी परीक्षा तारीख सुध्धा जाहीर करण्यात आलेली आहे.

परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या दहावी (SSC परीक्षा) व बारावीच्या परीक्षांवर (HSC परीक्षा) बहिष्कार टाकण्याचा सूचना दिला आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहार महामंडाळाने सरकारशी केला आहे.

बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 2024 च्या जानेवारी या महिन्यात होणार आहे, तसेच लेखी परीक्षा ही फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने म्हटले की जोपर्यंत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री हे प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या शाळांच्या इमारती तसेच संबंधित संस्थेचे कर्मचारी दहावी बारावी बोर्डांच्या परीक्षासाठी उपलब्ध करून देणार नाहीत, असे म्हणणे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे आहे. ssc-hsc board Exam 2024 update

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या मागण्या

  • महाराष्ट्र राज्यामधील राज्य शिक्षण संस्था महामंडळा मध्ये तसेच सर्व शाळा मध्ये शिक्षक आणि इतर कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यानुसार नवीन पदभरती करावी.
  • सर्व अनुदानित शाळांचे वेतनेत्तर अनुदान तसेच थकीत लवकर देण्यात यावे.
  • खाजगी कंपन्यांना शाळा दत्तक देऊ नये ही पण महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने म्हणणे मांडले आहे.
  • राज्यातील सर्व शाळा मध्ये नवीन शैक्षणिक धोरण राबविताना आर्थिक तरतुदी बाबत सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी आहे.

या मागण्या बाबत वारंवार सरकारला विविध माध्यमांद्वारे कळवले तरी सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे, वरील मागण्या मान्य केल्यावरच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या शाळांच्या इमारती तसेच संबंधित संस्थेचे कर्मचारी दहावी बारावी बोर्डांच्या परीक्षासाठी उपलब्ध करून देऊ, अन्यथा देणार नाही असे म्हणणे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे आहे.

Leave a Comment

Close Visit agrinews