Tax Rules on Leave Encashment : सरकारी नोकरी असो किंवा खाजगी, नोकरीदरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्याला अनेक प्रकारच्या सुट्ट्या मिळतात जसे की कॅज्युअल लीव्ह-CL, वैद्यकीय रजा, अर्जित रजा-EL, प्रसूती रजा इत्यादी प्रकारच्या रजा असतात.
दरवर्षी सरकारी/खाजगी कर्मचाऱ्यांना ठरावीक सुट्ट्या देतात, त्यापैकी आपण अर्जित रजा (EL) न घेतल्यास त्या बदल्यात कर्मचाऱ्यांना पैसे मिळतात, ज्याला लीव्ह एनकॅशमेंट (रजा रोखीकरण) असे म्हटले जाते. यापैकी काही सुट्ट्या निर्धारित वेळेत न घेतल्यास संपतात आणि काही सुट्ट्या नवीन आर्थिक वर्षात तुमच्या सुट्ट्यांच्या यादीत जोडल्या जातात. या सुट्ट्या नोकरी सोडल्यास किंवा सेवानिवृत्तीनंतर कर्मचारी या सुट्ट्या एनकॅश करू शकतात.
हे वाचा 👉 पत्नी सोबत पोस्ट ऑफिस मध्ये हे खाते उघडा आणि महिन्याला 10 हजार रुपये कमवा.
सुट्ट्यांच्या बदली तुम्हाला मिळणारी रक्कम तुमच्या उत्पन्नाचा भाग मानली जाते, म्हणून सरकारने लीव्ह एनकॅशमेंटवरही आयकर संबंधित काही नियम केले आहेत. सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी लीव्ह एनकॅशमेंटसंबंधित आयकर नियम वेगवेगळे आहेत.
जेव्हा एखादा कर्मचारी सुट्ट्या कॅश करतो तेव्हा त्याला मिळणारी रक्कम त्याच्या उत्पन्नाचा भाग मानली जाते, ज्यामुळे सरकारने लीव्ह एनकॅशमेंट (रजा रोखीकरण) संबंधित काही नियम निर्धारित केले आहेत. सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांच्या बाबतीत हे नियम वेगळे असून तुम्हीही नोकरी करत असाल तर तुम्हाला या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा 👉 PF कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! आता दरमहा पेन्शन मिळणार
रजा रोखीकरण आयकर नियम
जर कर्मचाऱ्याने नोकरी दरम्यान सुट्ट्या चे रजा रोखीकरण केल्यास एकूण रक्कम त्याच्या पगाराचा भाग मानली जाईल आणि करपात्र असेल. तुमच्या नोकरीदरम्यान रजा रोखीकरणवर मिळणारी रक्कम तुमच्या उत्पन्नात जोडली जाते. यानंतर तुमच्या आयकर स्लॅबनुसार कर वसूल केला जातो.
रजा रोखीकरण कर नियम
आयकर कलम ८९ अंतर्गत दिलासाही देण्यात आला आहे. परंतु यासाठी काही आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतील. तुम्ही ज्या वर्षात लीव्ह कॅश केली त्या वर्षाच्या अगोदर किमान पाच वर्षे तुम्ही त्याच नियोक्त्यासोबत सतत सेवेत असायला हवे. याशिवाय, लीव्ह एनकॅशमेंटची रक्कम तुम्हाला मिळालेल्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसावी.
सेवा निवृत्तीनंतर रजा रोखीकरणचे नियम
सेवानिवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर तुम्ही लीव्ह एनकॅश (रजा रोखीकरण) केल्यास सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठी नियम वेगळे आहेत.
आपण जर केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असाल आणि सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा राजीनामा देताना लीव्ह एनकॅश केल्यास मिळालेल्या एकूण रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही.
तसेच शासकीय कर्मचाऱ्याचा नोकरीवर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला मिळालेल्या लीव्ह एनकॅशमेंटवर कोणताही कर आकारला जात नाही.
जर तुम्ही खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असाल तेंव्हा तुमच्या सेवा निवृत्ती वेळी किंवा नोकरी सोडल्यानंतर लीव्ह एनकॅश (रजा रोखीकरण) केले तर २५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर नाही.
यापूर्वी ही मर्यादा तीन लाख रुपये होती. अशा स्थितीत, तुमच्या नियमित आयकर स्लॅबनुसार जादा रकमेवर कर आकारला जाईल. अश्या पद्धतीने आयकर नियमानुसार तुमच्या रजा रोखीकरण च्या रकमेवर कर आकारला जातो.