Tata Punch EV : आली इलेक्ट्रिक टाटा पंच, 21 हजार रुपयांमध्ये करा बुक..

Tata Punch EV : टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक पंच SUV भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. त्यासाठीचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. 21000 रुपये टोकन रक्कम भरून Tata Punch बूक केली जाऊ शकते. बुकिंगसाठी, डीलरशिप आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म दोन्हीची मदत घेतली जाऊ शकते. Tata punch electric vehicle

पंच EV मध्ये 4 गोष्टी खास आहेत ज्यात पॉवरट्रेन, चेसिस, इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर आणि क्लाउड आर्किटेक्चर यांचा समावेश आहे. सनरूफ पर्यायासह देखील पंच ईव्ही खरेदी करता येईल. टाटा पंच इलेक्ट्रिक कारमध्ये आणखी काय खास आहे ते जाणून घ्या.

इलेक्ट्रिक पंचची बॅटरी आणि रेंज

इलेक्ट्रिक पंच ही 300 किमी ते 600 किमी रेंज पर्यंत जाऊ शकते. हे प्लॅटफॉर्म AC चार्जिंगसाठी 7.2kW ते 11kW पर्यंतच्या ऑन-बोर्ड चार्जर्सना समर्थन देऊ शकते. तर DC फास्ट चार्जिंगसाठी, ते 150kW चार्जरला सपोर्ट करते.

असे मानले जाते की इलेक्ट्रिक पंच फक्त 10 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगमध्ये 100 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते.

Electric punch ची सुरक्षा

नवीनतम आर्किटेक्चरवर तयार केलेली कार ग्लोबल NCAP आणि भारत NCAP सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करेल. तसेच, कार ADAS स्तर 2 सुरक्षा वैशिष्ट्यांसह लॉन्च केली जाईल. पंच ला ग्लोबल NCAP कार क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाले आहे. म्हणजेच Tata Punch ही कार सुरक्षेच्या दृष्टीने देखील उत्तम आहे.

कारमध्ये केबिनसाठी पुरेशी जागा आणि स्टोरेज असेल.

Electric punch ची किंमत

सध्या, टाटा मोटर्सने फक्त पंच इलेक्ट्रिकच्या तपशीलांचे अनावरण केले आहे आणि त्याचे बुकिंग सुरू केले आहे. या कारची किंमत आणि इतर तपशील लवकरच कळवला जाईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews