राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 03 महत्त्वाचे शासन निर्णय जारी

State Employees shasan nirnay:1)सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक-एक्स-१ मुख्य लेखाशिर्ष २२३६- पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचे माहे

जानेवारी, २०२४ चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक-२ मधील लेखाशीर्ष/उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक-८ प्रमाणे एकुण रु.३६ कोटी (रुपये छत्तीस कोटी फक्त) इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

2)महाराष्ट्र कारागृह (संचित रझा आणि अभिवचन रझा)नियम, २०२४ च्या अंमलबजावणीबाबत

कारागृह अधिनियम, १८९४ (१८९४ चा ९) च्या कलम ५९ च्या खं (५) व (२८) याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्च करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन आणि महाराष्ट्र कारागृह (मुंबई संचित रजा व अभिवचन रजा) नियम, १९५९ चे अधिक्रमण करुन संदर्भाधीन अधिसूचनेन्वये महाराष्ट्र कारागृहे (संचित रजा व अभिवचन रजा) नियम, २०२४ करण्यात आले आहेत. सदर नियम अधिसूचनेतील प्रकरण एक प्रारंभिक मधील नियम-१ (२) नुसार महाराष्ट्र राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक ०२/१२/२०२४ रोजीपासून अंमलात आले आहेत,

२. सदरचे नियम करताना यापुर्वीच्या नियमांचे अधिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे दिनांक ०२/१२/२०२४ रोजी प्रलंबित असणाऱ्या संचित रजा व अभिवचन रजेसंदर्भातील प्रकरणांना महाराष्ट्र कारागृहे (संचित व अभिवचन रजा) नियम, २०२४ लागू राहील.

३. सबब, संचित रजा व अभिवचन रजेसंदर्भातील प्रलंबित प्रकरणांबाबत उक्त संदभांधीन अधिसूचनेच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा संकेतांक २०२५०२०५१६१००५६२२९ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

3) राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यालय अधीक्षक (गट-क) संवर्गातून सहाय्यक आयुक्त (गट-ब) संवर्गात सन २०२३-२४ च्या नियमित निवडसूचीतून पदोन्नती देणेबाबत.

शासन आदेश-राज्य उत्पादन शुल्क विभागातील कार्यालय अधीक्षक (गट-क) या संवर्गातून सहाय्यक आयुक्त (गट-ब) या संवर्गात पदोन्नती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सन २०२३-२४ च्या नियमित निवडसूचीमधील खालील कर्मचाऱ्यांना सहाय्यक आयुक्त (गट-ब) या संवर्गात पदोन्नती देण्यात येत असून सदर पदोन्नतीनंतर, त्यांची त्यांच्या नावासमोर (स्तंभ ४ येथे) दर्शविण्यात आलेल्या ठिकाणी पदस्थापना करण्यात येत आहे.

तीन शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas