महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत 20 लाख नवीन घरे मंजूर, पहा यादी

प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राला २० लाख घरे मंजूर

महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० लाख नवीन घरे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “या योजनेत यावर्षी आपल्याला ६.५ लाख घरे मंजूर झाली होती. मात्र, आता त्यात १३ लाख घरांची भर घालून एकूण २० लाख घरे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे. देशाच्या इतिहासात एका वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात घरे कोणत्याही राज्याला मिळालेली नाहीत.”

याशिवाय, मागील सर्वेक्षणातील निकषांमध्ये बदल करून खऱ्या बेघरांना नव्या सर्वेक्षणात समाविष्ट करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत या यादीतील सर्व लोकांना घरे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले.

Leave a Comment

Close Visit agrinews