मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर होणार आहे तर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे अनेक योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यात pm kisan samman nidhi योजनेचा हप्त्यात वाढ होणार म्हणजे दुप्पट होण्याची शक्यता आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत संसदेचे अधिवेशन चालणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येऊ शकतो.