pension GR : पेन्शन मध्ये बदल करणे संदर्भात महत्वाचा शासन निर्णय दि. – 16/01/2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
पेन्शन धारकांसाठी आज दिनांक 16/01/2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.१ जानेवारी २०२४ पासून वाढ करण्याबाबत हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सदर लाभ केवळ दि.०१.०१.२०२४ पासून देय राहील. तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीचव निवृत्तिवेतन घेत असलेल्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही.
ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे, यांमधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्ष व त्यापुढील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वरील शासन निर्णय लागू राहील.
८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात वाढ दि.०१.०१.२०१९ पासून सुधारित करण्यात आला आहे. शासन आता असा आदेश देत आहे की, सदर दर दि.०१.०१.२०२४ पासून पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहेत.