मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना, 3.15 लाख अनुदानासाठी या जिल्ह्यात अर्ज सुरू, mini tractor anudan yojna Maharashtra

mini tractor subsidy scheme : महाराष्ट्र राज्यात समाज कल्याण विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अवजारे पुरवण्या करिता विविध योजना राबवल्या जातात. प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट कालावधी साठी अर्ज सुरू असतात, त्याच प्रमाणे आता मिनी ट्रॅक्टर करिता ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना मार्फत 3.15 लाख अनुदान शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी राज्य सरकार कडून मिळवून दिले जाते, आता समाज कल्याण विभागामार्फत अर्ज सुरू झालेले आहेत. mini tractor subsidy scheme

अर्ज करण्याचे टप्पे

  • ऑनलाइन अर्ज सादर करणे
  • सारांश प्रिंट सादर करणे
  • लाभार्थी निवड
  • बिलाची पावती सादर करणे
  • वाहन परवाना सादर करणे

Mini tractor anudan yojana maharashtra

या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 3 लाख 15 रुपये अनुदान मिनी ट्रॅक्टर खरेदी साठी दिले जाणार आहे. सध्या या योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग परभणी मार्फत अर्ज करणे सुरू आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

कोणाला मिळणार मिनी ट्रॅक्टर

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे. बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता 3.15 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

अटी व शर्ती

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती वा नवबौद्ध घटकातील असावेत तसेच अध्यक्ष, सचिव, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत•

ट्रॅक्टर व त्याच्या उप साधनांच्या खरेदीवर 3.15 लाख शासकीय अनुदान अनुञेय राहील. ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.

अर्ज कसा करावा ?

ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews