Ration card update : राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करणेबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग द्वारा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 या वित्तीय वर्षा करिता जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे मोफत वाटप करण्याची योजना या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात येत आहे.
सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करा
रेशन कार्ड वर मोफत साडी वाटप करण्यात येणारी कॅप्टिव्ह मार्केट योजना आहे ही 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी राबविली जाणार आहे. कुटुंबातील एका महिलेस वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली हि साडी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील अंदाजे 24 लाख 80 हजार 360 कुटुबांना या योजनेचा लाभ सदरील लाभार्थ्याला होणार आहे.
साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येईल. लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमधून साडी वितरीत करण्यात येईल. शासनाने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रतिकुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत वाटप करण्यात येईल.