DA Hike । तुम्ही जर केंद्रीय सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण सरकार निवडणुकी पूर्वी महागाई भत्त्यात तब्बल 5 टक्के वाढ करण्याच्या तयारीत असल्याचे मीडिया रिपोर्ट नुसार समजले आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांत होणार असून, निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असून, त्यामागचा उद्देश जनतेला आकर्षित करणे हा आहे. दरम्यान, केंद्रात सत्तेत असलेला भाजपही जनतेला आकर्षित करण्यात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. आता असे मानले जात आहे की केंद्रातील मोदी सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करणार आहे, ज्याचा फायदा मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना होणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरकार फिटमेंट फॅक्टर देखील वाढवू शकते, ज्यामुळे मूळ वेतनात विक्रमी वाढ होईल. सरकारने अधिकृतपणे हा निर्णय घेतलेला नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो लवकरच होईल.
महागाई भत्त्यात वाढ
सध्या कर्मचाऱ्यांना ४६ टक्के लाभ मिळत आहे. आणखी 2024 या वर्षात लोकसभा निवडणुकीपुर्वी महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ होऊ शकते, त्यानंतर महागाई भत्ता हा 51 टक्के होईल, वाढवलेले डीएचे दर १ जानेवारीपासून लागू मानले जातील. असे मीडिया रिपोर्ट नुसार माहिती मिळाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता दर १ जानेवारी आणि १ जुलैपासून प्रभावी मानले जातात. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सरकार त्याची वाढ जाहीर करू शकते.