Cidco lottery 2024 : स्वःताच्या हक्काचे एक का होईना पण घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते; परंतु जर हेच घर मुंबईत असेल आणि आपल्या बजेट मध्ये असेल तर मग आनंद गगनात मावेना असे होईल, ज्या अर्थाने आता सिडको ने 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ३३२२ घरांची नव्याने योजना जाहिर केली आहे. या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी 26 जानेवारी 2024 रोजी पासून सुरू असून ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी समाप्ती 26 मार्च 2024 अशी आहे.
या योजनेची संगणकीय सोडत १९ एप्रिल रोजी काढली जाणार असल्याचे सिडकोच्या संबधित विभागाने कळविले आहे.
कुठे असणार घरे
CIDCO MASS HOUSING LOTTERY 2024
अधिकृत वेबसाईट येथे पहा
महत्वाच्या तारखा
- जाहिरात प्रसिद्ध – 26 जानेवारी 2024
- ऑनलाईन अर्जाची सुरुवात – 30 जानेवारी 2024
- ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी समाप्ती – 26 मार्च 2024
- सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची समाप्ती – 27 मार्च 2024
- ऑनलाईन पेमेंट स्वीकृती सुरुवात – 31 जानेवारी 2024
- ऑनलाईन पेमेंटचा अंतिम दिनांक – 28 मार्च 2024
- NEFT / RTGS चलन स्वीकृती – 28 मार्च 2024
- सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी – 5 एप्रिल 2024
- सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी – 10एप्रिल 2024
- लॉटरी सोडत – 19 एप्रिल 2024
तळोजा नोडमध्ये एकूण २८८७ घरे आहेत. त्यातील 312 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित 3010 घरे सर्वसाधारण घटकांसाठी आरक्षित असणार आहेत. या योजनेतील घरांसाठी ऑनलाईन नोंदणी २६ मार्चपर्यंत करता येणार आहे. तर ३० जानेवारी ते २७ मार्च या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. या योजनेची संगणकीय सोडत १९ एप्रिल रोजी काढली जाणार असल्याचे सिडकोच्या संबधित विभागाने कळविले आह