ड्रोनचा वापर पिकांची पाहणी करण्यासाठी तसेच पिकांवरील रोगांची तपासणी करण्यासाठी केला जातो. तसेच ड्रोनला लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने पिकांवरील कीड, रोगांची माहिती ठेवता येते महत्वाचे म्हणजे पिकांवर फवारणी करण्यासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त क्षेत्रावर ड्रोनच्या मदतीने फवारणी करता येते.
तुम्हाला ही drone subsidy मिळवायची असेल तर काय आहेत पात्रता, कसा अर्ज करावा, कोठे करावा याबद्दल पूर्ण माहिती पुढे दिली आहे.
Drone subsidy :- शासनाकडून आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यातच शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातले आहे. त्यामुळे शेतीची कामे अगदी सहजपणे आणि सोप्या पद्धतीने होण्यास मदत होत आहे. त्याअनुषंगाने ड्रोनचा वापर शेतीसाठी करण्याकरिता शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी शासनामार्फत विविध उपकरणे अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून दिली जात आहेत. नुकतेच पिकांवर औषध फवारणीसाठी ड्रोन अनुदान योजना शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. Drone subsidy yojna
असा करा अर्ज
शेतीसाठी ड्रोनचा वापर करायचा असेल तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. संबंधित कृषी सहायक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधून योजनेबद्दलची अधिक माहिती मिळवू शकता. कृषी विभागाकडून शेतकरी, कृषी पदवीधर व शेतकरी उत्पादक कंपनी यांना ड्रोन खरेदीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शासनाकडून मोफत ट्रेनिंग
अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना drone मिळाल्यानंतर शासनामार्फत ड्रोनफवारणी करतेवेळी कशा प्रकारे हाताळावा याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. तसेच औषधफवारणी करतेवेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी, याचे सुद्धा प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अनुदान किती मिळणार?
कोणाला | अनुदान टक्के |
विद्यापीठे व सरकारी संस्था | १०० टक्के अनुदान (१० लाख रुपयापर्यंत) |
शेतकरी उत्पादक संस्था | ७५ टक्के अनुदान (७ लाख ५०,००० रुपये) |
कृषी पदवीधारकासाठी | ५ लाखांपर्यंत अनुदान |
इतर शेतकऱ्यांना | ४० टक्के (४ लाख अनुदान) |