शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : जुनी पेन्शन योजना संदर्भात दि. 01 फेब्रू. 2024 रोजीचा अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित

old pension scheme GR : राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस/अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से. अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे. सद्य:स्थितीमध्ये समितीचे अहवाल तयार करण्याचे कामकाज अंतरिम टप्यावर असून अंतिम परिपूर्ण अहवाल सादर करण्याकरिता दि. 01 फेब्रू. 2024 रोजी महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2023 अन्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक 01 नोव्हेंबर, 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस/अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से. अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

सदर समितीने तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीचे सांख्यिकीय, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करुन शासनास परिपूर्ण शिफारस / अहवाल सादर करण्यासाठी समितीस वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक 27 जुलै 2023 अन्वये दोन महिन्यांसाठी दि. 14 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

सद्य:स्थितीमध्ये समितीचे अहवाल तयार करण्याचे कामकाज अंतरिम टप्यावर असून अंतिम परिपूर्ण अहवाल सादर करण्याकरिता समितीस दिनांक 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्या संबंधित शासन निर्णय पुढे पाहा.

शासन निर्णय

Leave a Comment

Close Visit agrinews