Talathi bharti 2023 distwise verification list : तलाठी भरती 2023 करिता अधिकृत संकेत स्थळावर गुणवत्ता यादी तसेच निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांची तलाठी भरती 2023 मध्ये निवड झाली आहे किंवा प्रतिक्षा यादीत नाव समाविष्ट आहे, अश्या उमेदवारांकरिता कागदपत्रे तपासणी साठी बोलवण्यात आले आहे. सदर यादी संबंधीत कार्यालयाचे जिल्हयाचे संकेतस्थळ वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
तलाठी पदभरती – 2023 साठी गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणीसाठी जिल्हानिहाय सूचना पहा
अ.क्र. | जिल्हा | कागदपत्रे तपासणी लिस्ट |
1) | बीड | https://beed.nic.in/ |
2) | हिंगोली | https://hingoli.nic.in/ |
3) | जालना | https://jalna.nic.in/ |
4) | जिल्हा निवडा | वरील प्रमाणे URL सर्च करा |
उमेदवारांसाठी सूचना
- संकेतस्थळावर आनलाईन पध्दतीने भरलेल्या मुळ अर्जाची प्रिंट आऊट (आवेदनपत्र) तसेच परिक्षा फीस जमा केल्याचा पुरावा.
- आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असलेल्या उमदेवारांनी शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र.एससीवाय 12/05/प्र.क्र. 189/म-7 दि. 23/01/2006 अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीने ज्या कुंटुंबास शेतकऱ्यांचे आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरविले असल्यास त्या बाबतचे कागदपत्रे.
- उक्त सर्व कागदपत्रांची पुर्ण पडताळणी तसेच जाहिरातीत नमूद सर्व निकषांची पुर्तता झाल्यानंतर अंतिम नियुक्तीची कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हा निवड समितीने राखुन ठेवले आहेत.
- छायाचित्र ओळख पुरावा (ओळखपत्र / Photo Identity card) (आधारकार्ड/ वाहन परवाना/पॅनकार्ड/ राज्यनिवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र / राष्ट्रीयकृत बँकेचे खातेपुस्तक) नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज 02 फोटो.
- वरील सर्व उमेदवारांना याद्वारे कळविण्यात येते आहे की, सदर यादी या कार्यालयाचे जिल्हयाचे संकेतस्थळ वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
- कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित न राहील्यास उमेदवारांच्या नावाचा समावेश केला जाणार नाही आणि त्यानंतर त्या निवड यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी दावा करता येणार नाही.
- शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवारांनी चारीत्रय व पुर्व चारीत्र पडताळणी करण्याबाबत सोबतच्या विहीत साक्षांकन नमुन्यात माहिती कागदपत्रे तपासणीच्या वेळेस भरुन सादर करावी.