Jilha Nyayalay Bharti 2025 : जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी येथे सफाई कामगार पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावा.
भरतीची संपूर्ण माहिती:
भरती विभाग | जिल्हा व सत्र न्यायालय, रत्नागिरी |
---|---|
भरती प्रकार | सरकारी नोकरी (कायमस्वरूपी) |
पदाचे नाव | सफाई कामगार (पूर्णवेळ) |
शैक्षणिक पात्रता | कुठलीही शैक्षणिक पात्रता आवश्यक नाही (अशिक्षित/7वी/10वी/12वी उत्तीर्ण अर्ज करू शकतात) |
अनुभव | संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य |
वयोमर्यादा | 18 ते 43 वर्षे |
मासिक वेतन | ₹15,000 ते ₹46,600 |
रिक्त पदांची संख्या | 01 |
नोकरीचे ठिकाण | जिल्हा व सत्र न्यायालय, रत्नागिरी |
भरती प्रक्रिया | मुलाखतीद्वारे निवड |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन (स्वतः अर्ज पाठवावा) |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मा. प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रत्नागिरी, खारेघाट रोड, ता. जि. रत्नागिरी – 415612 |
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक | 15 फेब्रुवारी 2025 सायं. 06:00 वाजेपर्यंत |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पात्रता आणि इतर अटी:
- राष्ट्रीयत्व: उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- शारीरिक क्षमता: सफाई कामगार पदासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक.
- अनुभव (प्राधान्य): शौचालय, स्नानगृह व कार्यालयीन स्वच्छतेचा पूर्वानुभव असल्यास संबंधित कार्यालयाचा दाखला आवश्यक.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:
उमेदवारांनी अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रत जोडाव्यात.
- जन्मतारखेचा पुरावा (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला किंवा एस.एस.सी बोर्ड प्रमाणपत्र).
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (असल्यास).
- अनुभव प्रमाणपत्र (संबंधित कार्यालयाचा दाखला असल्यास).
- चारित्र्य प्रमाणपत्र (जाहिरात प्रसिद्धीनंतरच्या दिनांकाचे, दोन प्रतिष्ठित व्यक्तींकडून).
- स्वयंघोषणापत्र (कुटुंबाचे प्रमाणपत्र, गुन्हेगारी बाबत घोषणा इ.).
- जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी).
- ना-हरकत प्रमाणपत्र (जर उमेदवार शासकीय सेवेत कार्यरत असेल तर).
- विवाहित महिलांसाठी नाव बदल दस्तऐवज (शासकीय राजपत्र, विवाह प्रमाणपत्र इ.).
- इतर आवश्यक कागदपत्रे (न्यायालय प्रशासनाने आवश्यकतेनुसार मागणी केल्यास).
महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज अपूर्ण असल्यास तो अपात्र ठरविला जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रे सादर करावी.
- अर्जामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल (असल्यास) आणि जन्मतारीख अचूक भरावी.
- चारित्र्य प्रमाणपत्र वगळता कोणतेही मूळ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडू नये.
अधिक माहिती:
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी जिल्हा न्यायालय, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.