अरबी समुद्रातील प्रवाशी बोटीचा भीषण अपघात; थरारक व्हिडिओ व्हायरल mumbai boat viral video December 19, 2024 by sarkari mitra मुंबईच्या एलिफंटा परिसरात बुधवारी दुपारी एक गंभीर बोट अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. दुर्घटनेचे कारण नौदलाच्या स्पीडबोटीने प्रवासी बोटीला धडक दिल्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघाताचा व्हिडीओ व्हायरल हा अपघात झाला तेव्हाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, एक छोटी स्पीडबोट पाण्यात ४-५ प्रवाशांसह प्रवास करत होती. ही बोट अचानक यू-टर्न घेते आणि प्रवासी बोटीच्या दिशेने वेगाने येते. शेवटच्या क्षणी स्पीडबोट दुसऱ्या दिशेला वळण्याचा प्रयत्न करते, परंतु ती प्रवासी बोटीला धडकते. या धडकेनंतर प्रवासी बोट हळूहळू बुडू लागते. Ladki Bahin Yojana : घरात या 5 वस्तू असतील तर महिलांना मिळणार नाही 6 वा हप्ता, जाणून घ्या नवीन नियम Watch: 13 dead, at least 98 rescued after ferry capsizes near Gateway of India, rescue ops underwayFollow Live For More Updates: https://t.co/e1qTQcplju pic.twitter.com/4KUNPFKfEX— The Indian Express (@IndianExpress) December 18, 2024 मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “अरबी समुद्रातील बुचर आयलंडजवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीडबोटीने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. दुपारी ३.५५ वाजता हा प्रकार घडला. या बोटीवर एकूण १०१ प्रवासी होते, ज्यापैकी सर्वांना बाहेर काढण्यात आले. मात्र, या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ३ नौदलाचे कर्मचारी आणि १० नागरिकांचा समावेश आहे.” मदतीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकार आणि नौदल यांच्या संयुक्त पातळीवर सखोल तपास केला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. गट नंबर टाकून तुमच्या जमिनीचा नकाशा, पहा मोबाईलवर नौदल, कोस्ट गार्ड आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी तैनात असून शोधमोहीम सुरू आहे. अपघाताची नेमकी कारणे आणि इतर माहिती पुढील तपासात उघड होईल. वनविभागात 10वी-12वी पास उमेदवारांसाठी 12,991 पदांची भरती; वेतन 15,000/- ते – 47,600/- रुपये पर्यंत