राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 53% वाढ; महत्वाचे पत्र जारी
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दि. १ जुलै, २०२४ पासून झालेली ३% वाढ राज्यात थकबाकीसह तत्काळ लागू करण्याबाबत मा. देवेंद्रजी फडणवीसमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ यांच्या कार्यालयाला दि. ०९ डिसेंबर, २०२४ रोजी विनंती पत्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांनी पाठवले आहे.
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दि. १ जुलै, २०२४ पासून ३ टक्क्यांची वाढ जाहीर केली असून, त्यामुळे हा भत्ता ५०% वरून ५३% इतका वाढविण्यात आला आहे.
राज्य सरकारचे धोरण केंद्राच्या धर्तीवरच महागाई भत्त्याची वाढ लागू करण्याचे आहे. त्यानुसार, राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील ही वाढ लागू करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
तदनुषंगाने, महाराष्ट्रातील अधिकारी-कर्मचारी महासंघाची विनंती आहे की
१. केंद्र शासनाच्या धर्तीवर दि. १ जुलै, २०२४ पासून महागाई भत्त्यात ३% वाढ तत्काळ मंजूर करण्यात यावी.
२. या भत्त्याचा लाभ थकबाकीसह मिळावा.
३. याशिवाय, महागाई भत्त्यासोबतच गृहभाडे भत्ता आणि अन्य संबंधित भत्त्यांमध्ये वाढ करून तो निर्णय त्वरित लागू करावा.
कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हक्कांसाठी व राज्य सरकारच्या धोरणानुसार, या निर्णयावर त्वरीत कार्यवाही होणे गरजेचे आहे. कृपया वरील मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.