महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि वेळ ठरली; ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार December 14, 2024 by sarkari mitra महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि वेळ ठरली महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख अखेर निश्चित झाली आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता राजभवनात शपथविधीचा सोहळा होणार आहे. यामध्ये ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अधिक महत्त्व देण्यात येणार असल्याचे समजते. वनविभागात 10वी-12वी पाससाठी 12,991 शिपाई, मदतनीस, सफाईकामगार, रक्षक पदांची भरती: वेतन ₹15,000 – ₹47,600 पर्यंत महायुतीचा फॉर्म्युला सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये खातेवाटपाचा २०-१०-१० असा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपला सर्वाधिक २० खाती, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी १० खाती मिळण्याची शक्यता आहे. घरात या 5 वस्तू असतील तर 2100/- रुपये मिळणार नाही, उद्यापासून नवीन नियम लागू मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वर्चस्व टिकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडे गृह आणि अर्थ यांसारखी महत्त्वाची खाती राहतील. शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता आहे, तर अजित पवार गटाला महसूल खाते देण्यात येऊ शकते. राज्य सरकार या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार महायुतीची बैठक आणि अंतिम निर्णय मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महायुतीची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीनंतर खातेवाटप निश्चित होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दिल्लीतील भेटी आणि चर्चासत्रे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी भेट घेतली आहे. या बैठकींमध्ये खातेवाटपावर चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा समन्वय राज्यातील महायुतीतील तीन पक्षांमध्ये समन्वय साधून खातेवाटपाचे अंतिम स्वरूप ठरवण्यात येणार आहे. भाजपकडे महत्त्वाची खाती राहतील, तर इतर गटांना समतोल राखत वाटप केले जाणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी सत्ता स्थैर्याला मजबुती मिळण्याची अपेक्षा आहे.