भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये 21413 पदांची मेगा भरती! पगार – 29380+ भत्ते, लगेच अर्ज करा

Post office Recruitment 2025:भारतीय डाक विभागातर्फे २०२५ मध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या (GDS) भरतीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. Branch Postmaster (BPM) आणि Assistant Branch Postmaster (ABPM) पदांसाठी एकूण २१४१३ जागा भरल्या जाणार आहेत, ज्यापैकी महाराष्ट्रात १४९८ जागा आहेत.

इच्छुक उमेदवार www.indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होईल आणि ३ मार्च २०२५ पर्यंत चालेल.

👉जाहिरात येथे पहा

👉👉ऑनलाईन अर्ज करा

महत्वाच्या तारखा:

कार्यक्रम तारीख

अर्ज सुरू होण्याची तारीख १० फेब्रुवारी २०२५

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५

शैक्षणिक पात्रता:

मान्यताप्राप्त बोर्डाकडून १०वी उत्तीर्ण (गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक).

इतर पात्रता:

संगणकाचे ज्ञान

सायकल चालवण्याचे ज्ञान

उपजीविकेचे साधन

वयोमर्यादा:

१८ ते ४० वर्षे (SC/ST साठी ५ वर्षे, OBC साठी ३ वर्षे सवलत)

अर्ज कसा करावा:

www.indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा.

आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज शुल्क भरा.

अर्जाची प्रिंटआउट घ्या.

निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर तयार केलेल्या यादीनुसार केली जाईल. गुणयादी तयार करताना प्राप्त गुणांवर/ग्रेड्स/पॉइंट्सचे गुणांमध्ये रूपांतरण केले जाईल. कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.

अधिक माहिती:

अधिक माहितीसाठी, कृपया अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा जाहिरात वाचा.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas