राज्य कर्मचाऱ्यांच्या DA वाढीनंतर घरभाडे भत्त्यातही वाढ; वित्त विभागाचा शासन निर्णय! जुलै 2024 पासून थकबाकी

HRA Allowance update : राज्य कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ; 1 जुलै 2024 पासून लागू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डी.ए.) वाढ झाल्यानंतर आता त्यांच्या घरभाडे भत्त्यात (HRA) देखील वाढ होणार आहे. ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू केली जाणार आहे.

वित्त विभागाने 5 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याचे नियोजन केले होते. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता 50% च्या वर गेल्यावर घरभाडे भत्ता सुधारित करण्याचा निर्णय घेतला होता.

नवीन घरभाडे भत्ता दर:
25 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे. त्यामुळे आता घरभाडे भत्ता शहर आणि गावांच्या वर्गीकरणानुसार सुधारित केला जाणार आहे:

  • मेट्रो व मोठी शहरे – 30%
  • मध्यम आकाराची शहरे – 20%
  • लहान शहरे व गावे – 10%

यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) खालील लिंकवर पाहू शकता…

👉👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews24tas