राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे फेब्रुवारी वेतना सोबत मिळणार हे 3 महत्त्वाचे लाभ
फेब्रुवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार तीन महत्त्वाचे लाभ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर फेब्रुवारी महिन्यात महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भात तीन महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
👉👉👉राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता बाबत मोठी अपडेट
निवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव
राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय केंद्र सरकार व इतर 25 राज्यांप्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणी प्रलंबित होती. राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवांतील अधिकाऱ्यांना लागू असलेल्या या वयाच्या मर्यादेची अंमलबजावणी राज्य कर्मचाऱ्यांसाठी करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
महागाई भत्ता (DA) वाढीचा निर्णय
राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3 टक्के वाढीव महागाई भत्ता (DA) देण्याचा प्रस्ताव सध्या प्रलंबित आहे. संबंधित प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री कार्यालयाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. महागाई भत्त्याच्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढण्याची शक्यता आहे.
👉👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
घरभाडे भत्ता (HRA) वाढ
सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदींनुसार महागाईचा दर 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यातही वाढ होणे अपेक्षित आहे. जुलै 2024 पासून राज्य कर्मचाऱ्यांना 3 टक्के वाढीव DA देण्यात येणार आहे. त्यामुळे महागाई भत्ता 53 टक्क्यांवर जाईल आणि त्यामुळे वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित HRA लागू होईल. त्यानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणांनुसार 30 टक्के, 20 टक्के किंवा 10 टक्के घरभाडे भत्ता लागू होईल.
फेब्रुवारी महिन्यात या निर्णयांमुळे राज्य कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. हे निर्णय कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागण्यांची पूर्तता करणारे ठरणार आहेत.