शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : शेतकऱ्यांना आता १५ हजार रुपये मिळणार
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नमो किसान सन्मान निधी’मध्ये राज्याचा वाटा ३ हजार रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १५ हजार रुपये मिळतील.
👉👉अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा
योजनेची माहिती:
- केंद्र सरकार: ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत वर्षाला ६ हजार रुपये देते.
- राज्य सरकार: ‘नमो किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत आता वर्षाला ९ हजार रुपये देणार आहे.
- एकूण: शेतकऱ्यांना आता वर्षाला १५ हजार रुपये मिळणार.
घोषणा कधी झाली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमध्ये ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ १९ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथे झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
- या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वनामती येथील कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
- यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
निवडणूकपूर्व लोकप्रिय घोषणांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आला आहे. त्यातच, शेतकऱ्यांच्या अनुदानात वाढ केल्यामुळे तिजोरीवर आणखी बोजा पडणार आहे. त्यामुळे वित्तीय तूट वाढण्याची शक्यता आहे.