शबरी घरकुल योजनेत बदल, 2.50 लाख अनुदान, शासन निर्णय

sarkari mitra
2 Min Read

शबरी घरकुल योजनेत नवीन बदला संदर्भात आज दिनांक 11-04-2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

shabri Adivashi yojna 2024

आदिवासी उपयोजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

Shabri Adivashi yojna ही आतापर्यंत ग्रामीण भागात राबवली जात होती. परंतु आता दिनांक 11-04-2024 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयान्वये नवीन बदल करण्यात आले आहेत. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना 2.50 लाख अनुदान देण्यात येते.

शासन निर्णय

राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपडयांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील लाभाथ्यर्थ्यांना शबरी आदिवासी घरकूल योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

लाभार्थी पात्रता –

१) अनुसूचित जमातीचा असावा.

२) स्वत:च्या नावाने पक्के घर नसावे

३) महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षापासून रहिवासी असावा.

४) घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.

५) यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकूल योजनेचा लाभ घेतलेला नसावा

६) वय वर्षे १८ पूर्ण असावे.

७) स्वत:च्या नावाने बैंक खाते असावे.

शासन निर्णय येथे पहा

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *