How to get NABARD subsidy for dairy farming
भारतातील दुग्धव्यवसाय हा एक मोठा व्यवसाय आहे आणि दरवर्षी दुधाचे उत्पादन वाढत आहे. भारतातील दुग्धव्यवसाय अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात, दुग्धव्यवसायासाठी नाबार्ड सबसिडी सुरू करण्यात आली. NABARD Dairy Loan Scheme
दुग्धव्यवसाय हे ग्रामीण भागात उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. आज बहुतेक शेतकरी शेती व्यवसाया सोबत हा व्यवसाय करत आहेत. सरकारने 2010 मध्ये नाबार्डच्या माध्यमातून डेअरी उद्योजकता विकास योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला . या लेखात आपण दुग्धव्यवसायासाठी नाबार्डचे अनुदान कसे मिळवायचे ते पाहू. How To apply NABARD Dairy Loan Scheme
NABARD DAIRY FARMING Subsidy Scheme कोण लाभ घेऊ शकतात
सामान्य शेतकरी, असंघटित आणि संघटित क्षेत्रातील गट, बचत गट, डेअरी सहकारी संस्था, दूध उत्पादक संघटना आणि पंचायती राज संस्था
NABARD DAIRY FARMING Subsidy Scheme योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेंतर्गत सहकारी, प्रादेशिक, व्यावसायिक, ग्रामीण किंवा नाबार्ड बँकांकडून डेअरी व्यवसायासाठी ७ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
- घेतलेल्या कर्जावर सरकारकडून ३३.३३ टक्के अनुदान.
- कमीत कमी दोन ते कमाल १० जनावरे खरेदी करू शकता.
- या योजनेसाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडून निधी दिला जातो.
- जनावरांच्या चाऱ्याची तरतूद करण्यासाठी अर्जदाराकडे पूरेशी जमीन असणे आवश्यक
- १८ ते ६५ वर्ष वयोगटातील पात्र अर्जदार या योजनेचा लाक्ष घेवू शकतात.
NABARD DAIRY FARMING Subsidy loan Scheme
या योजनेंतर्गत डेअरी व्यवसायासाठी विविध प्रकारे कर्ज दिले जाते. यामध्ये पशुधन खेरदी, मिल्किंग मशिन, डेअरी प्रोसेसिंग युनिट, वाहतूक, शीतगृह आणि डेअरी मार्केटींग आऊटलेट यासाठी कर्ज दिले जाते.
Nabard Dairy Farming loan कर्ज घेण्याची प्रक्रिया
डेअरी व्यवसाय योजना कर्ज अर्जासाठी अर्जदाराला जवळच्या सहकारी, प्रादेशिक, व्यावसायिक, ग्रामीण किंवा नाबार्ड बँकेत जावे लागेल. डेअरी उद्योजकता विकास योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठीच्या अर्जासोबत इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. त्यानंतर तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे आणि इतर पात्रता तपासून कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि दिलेल्या कर्जावर 33% सबसिडी मिळते.