लाडकी बहीण योजना नवीन वेबसाइट; नवीन नियम लागू

लाडकी बहीण योजनेतील नवीन नियम लागू

राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, ज्यामुळे अनेक महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. लवकरच शासनाकडून अपात्र महिलांची यादी जाहीर होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक महिलांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

👉👉नवीन वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👉👉https://testmmmlby.mahaitgov.in/

योजनेसाठी लागू केलेले नवीन नियम

शासनाने योजनेमध्ये काही नवीन निकष लागू केले आहेत, ज्यामुळे फक्त 22% महिला पात्र ठरतील, अशी माहिती समोर येत आहे. पूर्वीच्या नियमांमुळेही अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे नवीन नियम समजून घेणे गरजेचे आहे.

निवडणुकांनंतर योजनेच्या निकषांमध्ये बदल

राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, महायुतीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकांदरम्यान या योजनेमुळे महिलांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे 2 कोटी 40 लाख महिलांनी योजनेचा लाभ घेतला होता. परंतु आता शासनाने निकष बदलले असून, त्यानुसार केवळ 22% महिलाच पात्र ठरणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

राजू शेट्टींची सरकारवर टीका

माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयावर टीका करत, सर्व महिलांना सरसकट लाभ देण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, निवडणुकीच्या आधी सगळ्या महिलांना लाभ दिला गेला, परंतु आता निकष लावून महिलांना वंचित ठेवले जात आहे. याला त्यांनी भेदभावपूर्ण निर्णय म्हटले आहे.

महिलांसाठी सरसकट लाभाची मागणी

राजू शेट्टी यांनी सर्व पात्र महिलांना डिसेंबरपासून सरसकट ₹2100 देण्याची मागणी केली आहे. तसेच, महिलांना निवडणुकीत दिलेले वचन पाळावे, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.

लाडकी बहीण योजनेतील बदलांमुळे महिलांमध्ये नाराजी आहे. नवीन निकष लागू केल्यामुळे अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. याबाबत सरकारने सर्वसमावेशक विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment