लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता: सरकारचा महिलांसाठी मोठा निर्णय…

लाडकी बहिण योजना: सहावा हप्ता अद्ययावत माहिती

लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रातील महायुती सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली ही योजना महिलांसाठी आर्थिक मदतीचे साधन ठरत आहे. योजनेतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या आधार-लिंक खात्यात जमा केले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 2 कोटी 34 लाख पात्र महिलांच्या खात्यात पाच हप्त्यांमध्ये एकूण 7500 रुपये जमा झाले आहेत.

लाडकी बहीण योजना, 6 वा हप्ता अपडेट

परंतु काही महिलांना, त्यांचे अर्ज मंजूर असूनही, या योजनेचा लाभ मिळालेला नाही. विशेषतः ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर केलेल्या काही महिलांना अद्याप हप्ता मिळालेला नाही. सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी महायुती सरकारकडून नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढील माहितीमध्ये आपण या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत.

सरकारकडून महिलांच्या खात्यात जमा होणार 2100 रुपये

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाल्यानंतर सरकारने जाहीर केले आहे की योजनेचा दरमहा हप्ता 1500 रुपये वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात नवीन हप्ता म्हणून 2100 रुपये जमा करण्यात येतील.

लाडकी बहीण योजना, 6 वा हप्ता अपडेट

9600 रुपये मिळणार पात्र महिलांच्या खात्यात

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतर्फे अनेक महिलांनी अर्ज केले होते परंतु काही महिलांना अजूनही एकही हप्ता मिळालेला नाही. यामध्ये बहुतांश महिलांचे खाते आधार लिंक नसल्यामुळे किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा झाले नव्हते. अशा महिलांना आता एकाच वेळी 7500 रुपयांचे उर्वरित हप्ते आणि डिसेंबर महिन्याचा 2100 रुपयांचा हप्ता मिळून एकूण 9600 रुपये त्यांच्या खात्यात लवकरच जमा केले जातील.

9600 रुपये या महिलांच्या खात्यात जमा

ऑक्टोबर महिन्यातील अर्ज मंजुरीची प्रक्रिया

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून कोणतीही महिला वंचित राहू नये, यासाठी अर्ज प्रक्रियेत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत वाढ दिली होती. या कालावधीमध्ये अनेक महिलांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज सादर केले आहेत. अर्ज मंजूर होण्याबाबत महिलांमध्ये साशंकता असल्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

महाराष्ट्रातील महिला लाभार्थ्यांसाठी लाडकी बहीण योजना अधिक लाभदायक ठरली आहे. या योजनेत वाढ करण्यात येत असलेल्या हप्त्यामुळे महिलांना आर्थिक मदत होणार आहे, तसेच योजनेतील अपूर्ण अर्ज डिसेंबर महिन्यात मंजूर करण्यात येतील, हे सरकारने जाहीर केले आहे.

Leave a Comment

Close Visit agrinews