8 व्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्याचा तयारीत आहे, येत्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. Budget 2024
केंद्रीय कर्मचारी 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असेल, तर तुम्हाला येणाऱ्या बजेटमध्ये चांगली बातमी मिळू शकते. 8th pay commission news
केंद्र सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी आगामी अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाबाबची घोषणा करेल अशी श्यकता वाटत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. सरकार लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोगाबाबत विचार करु शकते.
वेतनात होईल वाढ
सरकार 10 वर्षांतून एकदा वेतन आयोग स्थापन करते. सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन केल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ होऊ शकते. म्हणजेच मूळ वेतनात 8 हजार रुपये वाढ होऊ शकते.